सिन्नर । दि. २३ प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत नवनवीन उपक्रम राबविणाऱ्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सिंधू छाया कॅम्पसमधील एस. व्ही. आय. टी. द्वितीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजीत सी.सी. प्लस प्लस फंडामेंटल्स या विषयावरील सात दिवसीय प्रशिक्षणाचा नुकताच समारोप करण्यात आला. संस्थेच्या सीईओ डॉ. सुष्मिता विखे पाटील यांच्या संकल्पनेतून प्राचार्य डॉ. जी. बी. शिंदे, विभाग प्रमुख डॉ. राणा महाजन, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर सोनटक्के ह्यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण पार पडले. टेकनॉरबीट संगमनेर या प्रथितयश प्रशिक्षण संस्थेचे तज्ञ अमोल रहाणे यांनी या ट्रेनिंगचे कार्यवाहन केले. इंजीनियरिंग शिक्षण पूर्ण करणारा विद्यार्थी आणि इंडस्ट्रीमधील आवश्यक असे मनुष्यबळ यामध्ये कमालीची तफावत असल्याचे बोलले जाते. हे प्रशिक्षण अशा त्रुटींना दूर करून इंडस्ट्रीसाठी आवश्यक असे कौशल्य असलेले विद्यार्थी घडवण्यास मदत करते असे प्राचार्य डॉ. शिंदे म्हणाले. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी प्रा. अर्चना हटकर, प्रा. लीलाधर भामरे, प्रा. बिबवे, प्रा. वाबळे, तुषार लुटे, स्मृती हासे यांनी परिश्रम घेतले.

Comments